गच्चीवर मांजराची पिल्ले सोडल्याने चाकूहल्ला

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : गच्चीवर मांजराची पिल्ले का सोडली, असा जाब विचारत चौघांनी मजुरावर चाकूहल्ला केला. यात फिर्यादीच्या डोक्याला मार लागला. ही घटना २३ जानेवारीच्या रात्री साडेदहा वाजता जहांगीर कॉलनी, हर्मूल परिसरात घडली. मजुराच्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शंकर तेजराव काकडे (२४), रवींद्र काकडे (२१), दिपाली, दिक्षा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.